बेगमपुर्‍यात ‘झन्‍ना-मन्‍ना’ जुगार खेळणारे पाचजण अटकेत; ७० हजारांचा मुद्देमाल जप्‍त

Foto

औरंगाबाद : बेगमपुरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील निपट निरंजन महाराज मंदिर परिसरात लिंबाच्या झाडाखाली पैशावर झन्‍ना-मन्‍ना नावाचा जुगार खेळणार्‍या पाच जुगार्‍यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला आहे.

उत्तम भागीनाथ सलामपुरे, जगदीश महाराज दायमा, कैलास बाबुराव मगरे, कचरू साळूबा दणके (सर्व रा. पहाडसिंगपुरा), अतुल भालचंद्र देशपांडे (रा.आकाशवाणी, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत. 
पहाडसिंगपुरा भागातील निपट निरंजन महाराज मंदिर परिसरात विद्यापीठाच्या भिंतीलगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली हे पाचजण झन्‍ना-मन्‍ना नावाचा जुगार खेळत होते. बेगमपुरा पोलिसांनी तेथे छापा मारून या जुगार्‍यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून रोख ३० हजार ६७० रुपये, तीन दुचाकी वाहन असा एकूण ६७ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक हैदर शेख करीत आहेत.